शाबास गुरुजी एज्युकेशन

हि संस्था Schools/Colleges, Coaching Institutes व Service Business ला Digitalize करुन Automation System शिकविण्याच्या उद्देशाने सुरू आहे. या संस्थेमध्ये उद्योगांना डिजिटलाईज करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते आणि जे आधीच डिजिटल आहेत त्यांना ऑटोमेशन शिकवले जाते. तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मिती कौशल्य विकास प्रशिक्षण लवकरच सुरू होत आहे.

तसेच डिजिटल युगात वावरतांना स्वत:ची सुरक्षा कशी करावी याबद्दलचे मार्गदर्शन केले जाते.

श्री. सुभाष बडे

 यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे.  कोरोना काळात डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 1,50,000 शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले.  सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील  गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत…. 

  • राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार (काव्यमित्र संस्था पुणे)
  • राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार ( माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन) 
  • सर्टिफाईड एन.एल.पी. प्रक्टिशनर (ए.एन.एल.पी. ईंडिया)
  • वीरचक्र पुरस्कार (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)
  • सर्टिफाईड लिडरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम (धन्वंतरी इंडिया प्रा. लि.)

प्रशिक्षणार्थींनी लिहिलेल्या कविता 

⭕ आम्ही तंत्रस्नेही शिक्षक ⭕

मी आहे तंत्र अडाणी
बडे सरांचा मंत्रकानी,

करील मजला तंत्रज्ञानी
गाऊ त्यांची गोड गाणी,

बडे सरांची अमृतवाणी
तंत्रज्ञानाचा खजिना भारी,

आम्हाला मोबाईलने जोडी
तोंडावर बोट हाताची घडी,

बडे सरांची जादूगिरी
मोबाईलशी लावली जोडी,

अँपची आहे मजाच न्यारी
तंत्रज्ञानाचा जुगाड भारी,

बडे सरांची वाणीच न्यारी..
आदरणीय बडे सर…!

तुमचा  प्रशिक्षणार्थी
श्री. राजेश तेलगोटे सर

⭕आम्ही तंत्रस्नेही शिक्षक ⭕

बडे सर तुम्ही खंरच कमाल केली
अवघड काम सोपं करूनी धमाल उडवून दिली.

Advance डिजिटल तंत्रज्ञानातले तुम्ही मुरब्बी
प्रत्येक सेशन्स सुरेख पटवून केली आमची प्रगती.

बोलण्याची अदा निराळी इतरांना खिळवून ठेवण्याची कला
बडे सर तुमचे डिजिटल ज्ञान पाहूनी अभिमान वाटतो आम्हाला.

सगळेच सेशन्स तुम्ही उत्तमपणे आम्हास शिकवले .
सहजपणे तञज्ञानाची दालने
उघडून आम्हास डिजिटल करून टाकले.

या गृप मध्ये येऊन एक मनाला समाधान वाटले
बडे सरासारखे अनुभवी मार्गदर्शक यामध्ये भेटले.

तुमचा उत्साह पाहूनी आम्हाला उत्तेजन मिळाले
डिजिटल तंत्रज्ञान किती  महत्वाचे  हे तुमच्या मुळे कळाले.

आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर
बडे सरासारखा अढळ ध्रुव तारा
जर कोणाला आढळला तर
समजून घ्या नक्कीच त्या व्यक्तीचा भाग्योदय झाला.

तुमची  प्रशिक्षणार्थी
सौ. ऊलका शिरीष कुलकर्णी

⭕ आम्ही तंत्रस्नेही शिक्षक ⭕
 
 बडे सरांचे ज्ञानस्नेही आहोत आपण  
आता तंत्र नवे शिकूया…
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या…

नाही अवघड काही येथे, फारच आहे easy
बडे सरांसोबत रोज आपण होऊ जरा Busy…  

सरांच्या meeting मध्ये जॉईन होऊन  
आपण दृष्टिकोन zoom करूया
 टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या….
 
Chatbox मध्ये मत मांडून होईल शंकासमाधान…
 युट्युब वर जाऊन करू ज्ञानाची देवाणघेवाण …
 Login करू ezee app अन विश्वास मनात जागवू या…
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या…  

शिकवतो आपण नेहमी त्याला देऊ थोडे टेक्निक…
शाबास गुरुजीच्या वेबसाईटवर सारेच करू या क्लिक…
 
व्हिडिओ पाहून share, like अन download करु या  
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारेच तंत्रस्नेही होऊ या …

तुमची प्रशिक्षणार्थी
– करुणा

चला शाबास गुरूजींच्या शाळा
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।

 
OTG कनेक्शन, माऊस पाँईंटर,
Keep नोटसचा केला वापर,
गुगल ड्राइव्हचा दैवी अवतार
15GB चा फुकटचा वापर,
वेळ कोर्सची व्यवस्थित पाळा ||1||
 
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।
बँकग्राऊंड Eraser पाहिला
फोटो पाहिजे तसा बनविला,
पिक्सल लॅबवर प्रोजेक्ट केला
RAR वर मराठी फॉन्ट घेतला,
फोटो एडीटरचे नियम पाळा ।।2।।
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।|

KineMaster चा भावच न्यारा
आँडीओ व्हीडीओ चा येथे तोरा
अँनिमेशन टाईम करा अँडजस्ट
नाही तर वाजल तुमचा बोरा,
मिळेल ग्रिनस्क्रिनचा फळा ||3||
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।
 
Xodo वर पाठ घेऊन
फेसबुक पेज दाखवा,
फार्मस अँपवर सर्वेहर्ट
माहिती पटापट मिळवा,
गुगल फॉर्म परीक्षेचा ताळा।।4।।
जमला तंत्रस्नेहींचा मेळा।

तुमचा प्रशिक्षणार्थी
श्री. शहाजी अनंत कुंभार 

⭕ सरस्वतीपूत्र सुभाष बडे सर ⭕

 ज्यांची भाषा सुस्पष्ट, साधी,सरळ,सोपी
असे  सुभाषिक सुभाष सर.  
नावाला साजेल असेच सुभाषिक आहात तुम्ही. काय बोलावं सर तुमच्याबद्दल …..
मूर्ती लहान पण ज्ञान मात्र बडे,
असे आमचे,आम्हाला आमच्या भाग्याने लाभलेले  सरस्वतीपुत्र बडे सर. *  
सर,  तुमचा अभ्यास बडा,  तुमचं ज्ञान अफाट( बडे)  
ते समजावून सांगण्याची कला बडी,  
ट्रेनिंग मधील वीस पंचवीस वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एका वेळेला हॅण्डल करण्याची तुमची क्षमता बडी, प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देऊन त्यांचे  शंकासमाधान करण्याचं तुमचं कौशल्य बडे.
अडीचशे-अडीचशे जणांचे ग्रूप सांभाळण्याचं तुमचं कौशल्य,आणि तुमचा संयम खूपच बडा.
तुमचं अध्यापन कौशल्य अफलातुन,
बडे सर तुमचा स्टॅमिना बडा, तुमचा वक्तशीरपणा बडा.
तुमची धडपड बडी, तुमचे प्रयत्न बडे.
आणि सर्वात महत्त्वाचे या सगळ्यांसाठी जे आवश्यक आहे ते  प्लॅनिंग जबरदस्त बडे.
जे काही स्वतःजवळ आहे,ते सगळं काही मनापासून देण्याची तुमची भावना बडी
काहीही हातचं राखून न ठेवता  संपूर्ण ज्ञान आपल्या समोरच्या प्रत्येक  वयोगटाच्या विद्यार्थ्यांला मनापासून देण्याचं  काम करणारा तुमच्यातला शिक्षक खूप खूप बडा आहे.
 काय बोलू आणखी तुमच्यासाठी सर, तोंडातून येतो एकच उद्गार, शाबास गुरुजी.
खरोखरच आपण सर्वार्थाने, सर्व बाजूंनी नावाप्रमाणेच बडे आहात सर,  तुमच्यातल्या या शिक्षकाला मनापासून सलाम. लाख मोलाचं ज्ञान देणा-या तुम्हाला,  तुमच्या या ज्ञानार्जन कार्यास, माझ्या लाख लाख शुभेच्छा. खूप खूप खूप धन्यवाद सर.
🙏🙏 *विद्वान सर्वत्र पूज्यंते हेच खरे 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐  

   ✒️ लेखन ✒️    
 ✍️ प्रशिक्षणार्थी सौ.अर्चना पाटील✍

⭕ शाब्बास गुरुजी ⭕

शाब्बास गुरुजींची टीम
आहे लईच ओ भारी!
बडे सर आणि टीमचे
राहु सदैव आम्ही आभारी!!
मनमिळावू स्वभाव
सेवाभावी वृत्ती जपली!
शाब्बास गुरुजींच्या टीमने
अध्यापनाची वाट दावली!!
सखोल आणि खोलवर
दिले तंत्रज्ञानाचे ओ धडे!
हसतमुख आणि दिलदार
आहेत सर आमचे ओ बडे!!
मोबाईल पडत होता भारी
त्याची कमी केली दादागिरी!
बनवून त्याला आमचा पीए
दिली आम्हाला ओ उभारी!!
कोरोनाच्या या संकटात
अवघड झाले अध्यापन!
कानमंत्र देऊन बडे सरांनी
वाढवली जगात आमची शान!!
आम्ही अडाणी गुरुजी
अडकून पडलो घरात!
ऑनलाईन अध्यापनाची करावी लागे कसरत!!
शाब्बास गुरुजींची टीम
आली बघा ती धाऊन!
हसत खेळत तंत्रज्ञानाचे
दिले आम्हा अनमोल ज्ञान!!
आता नाही मागे हटणार
शाब्बास गुरुजी होणार!
शाब्बास गुरुजी टीमचे
विश्वात नाव मी करणार!!
झालोय अॅडव्हांस आम्ही आता
नाही कशातच मागे राहणार!
घेऊन शाब्बास गुरुजींचे नाव
बिनधास्त उडी ओ मारणार!!
सोबत राहो अशीच आपली
मैत्रिच्या या कट्ट्यावर!
फडकत रहावा झेंडा
आपला तंत्रज्ञानाच्या या युगावर!!

कवी:- भा. रा. कडू संगमनेर जिल्हा अहमदनगर

⭕ शाबास गुरुजीसाठी दोन शब्द ⭕

 आभार कसे मानू सर, शब्द अपुरे पडले,  
भावना इतक्या भरल्या आहेत, मन माझे गोठले|      
शब्दात नाही मांडता येत येत भाव माझ्या मनीचे |  
पण नक्की माझे भाव कळतील शब्दांच्या पलीकडचे||      
नेत्रा मॅडम मुळे मी या ऍडव्हान्स कोर्सला आले  
बडे सर त्यामुळेच मी तुमच्या जादुई दुनियेत पोहोचले    
पंधरा दिवसात सर तुम्ही, आम्हाला जादूच्या नगरीत नेले| वेगवेगळे ॲप्स शिकवून स्पर्धेच्या जगात जगायला शिकवले| राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होऊन तुम्हाला गर्व नाही कुठला | तुमच्या रूपाने आम्हाला एक जादूगार की हो भेटला     तंत्रज्ञानाचा खजिना तुम्ही आमच्या पुढे ठेवला    
लाखो शिक्षकांच्या घरोघरी ज्ञानाचा दिवा लावला      
प्रत्येक दिवस सर तुम्ही,आमचा नाविन्याने भरला    
मनापासून तळमळीने शिकवताना जीव तुम्ही ओतला           पैशात तुमचे मोल सर कधीच मोजता येणार नाही      
ज्ञानाचे मोल तुमचे पैशाने भरून निघणार नाही            
 रोज रोज नवीन फंडे घेऊन, शाबास गुरुजी तुम्ही आलात लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचून प्रत्‍येकाला तंत्रस्नेही बनवतात             एवढ्याशा छोट्या मोबाईलची करामत
सर तुम्ही आम्हाला शिकवली      
त्याला आमचा PA करून
गुगलवर क्लाऊड स्पेस ची ओळख करून दिली            
पेन हातात न घेता कीप नोट्स वर लिहायला शिकवले बॅकग्राऊंड इरेझर ने मॅजिक इफेक्ट ग्राफिक्सने आणता आले         मराठी कॅलिग्राफीने तर कमालच केली,
हँडरायटिंग बदलले एका क्लिकने
माझे हँड रायटिंग स्टायलिश की हो झाले    
काईन मास्टरचा तर नखरा की हो आगळा वेगळा  
बेसिक ,ऍडव्हान्स ,सुपर अँडव्हान्स ने लावला मला लळा     किती घेऊ विषय नि किती करू त्यांचे व्हिडिओज
असे  मला  झाले    
कल्पनांच्या पंखांना उडण्याचे बळ काईन मास्टर ने दिले  बेनीमच्या मेनूंमुळे आम्हाला कल्पनेच्या जगात नेऊन सोडले व्हाईट बोर्ड च्या ॲनिमेशनने  बोर्ड्स छान कलरफुल झाले   पीडीएफ फाईल चा प्रभावी वापर कसा करावा हे कळले फेसबुक पेज वरील ब्लॉग्स सगळ्यांनी वाचले
खूप लाईकस आणि कमेंटसही फेसबुक पेजवर आल्या   त्यामुळे आत्मविश्‍वास वाढला नि
आनंदाच्या लाटा मनात उसळल्या      
 गुगल फॉर्मस् नि क्विज तयार करता येऊ लागली    
नवीन माझ्या बिझनेसला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली       काही आम्हाला आडले तर , हाक मारू सर आम्ही तुम्हाला हाक मारताच मदतीला याल सर, खात्री आहे आम्हाला   खूप खूप धन्यवाद नि खूप खूप शुभेच्छा  
तुमचे स्वप्न पूर्ण होऊ दे  
आमची सदिच्छा  
आमची सदिच्छा  !                              
✒️ लेखन ✒️
✍️सौ. संजीवनी औटी✍️

⭕ शाब्बास गुरुजी ⭕

शाब्बास गुरुजींची टीम
आहे लईच ओ भारी!
बडे सर आणि टीमचे
राहु सदैव आम्ही आभारी!!
मनमिळावू स्वभाव
सेवाभावी वृत्ती जपली!
शाब्बास गुरुजींच्या टीमने
अध्यापनाची वाट दावली!!
सखोल आणि खोलवर
दिले तंत्रज्ञानाचे ओ धडे!
हसतमुख आणि दिलदार
आहेत सर आमचे ओ बडे!!
मोबाईल पडत होता भारी
त्याची कमी केली दादागिरी!
बनवून त्याला आमचा पीए
दिली आम्हाला ओ उभारी!!
कोरोनाच्या या संकटात
अवघड झाले अध्यापन!
कानमंत्र देऊन बडे सरांनी
वाढवली जगात आमची शान!!
आम्ही अडाणी गुरुजी
अडकून पडलो घरात!
ऑनलाईन अध्यापनाची करावी लागे कसरत!!
शाब्बास गुरुजींची टीम
आली बघा ती धाऊन!
हसत खेळत तंत्रज्ञानाचे
दिले आम्हा अनमोल ज्ञान!!
आता नाही मागे हटणार
शाब्बास गुरुजी होणार!
शाब्बास गुरुजी टीमचे
विश्वात नाव मी करणार!!
झालोय अॅडव्हांस आम्ही आता
नाही कशातच मागे राहणार!
घेऊन शाब्बास गुरुजींचे नाव
बिनधास्त उडी ओ मारणार!!
सोबत राहो अशीच आपली
मैत्रिच्या या कट्ट्यावर!
फडकत रहावा झेंडा
आपला तंत्रज्ञानाच्या या युगावर!!

कवी:- भा. रा. कडू संगमनेर जिल्हा अहमदनगर

⭕ सरस्वतीपूत्र सुभाष बडे सर ⭕

 ज्यांची भाषा सुस्पष्ट, साधी,सरळ,सोपी
असे  सुभाषिक सुभाष सर.  
नावाला साजेल असेच सुभाषिक आहात तुम्ही. काय बोलावं सर तुमच्याबद्दल …..
मूर्ती लहान पण ज्ञान मात्र बडे,
असे आमचे,आम्हाला आमच्या भाग्याने लाभलेले  सरस्वतीपुत्र बडे सर. *  
सर,  तुमचा अभ्यास बडा,  तुमचं ज्ञान अफाट( बडे)  
ते समजावून सांगण्याची कला बडी,  
ट्रेनिंग मधील वीस पंचवीस वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एका वेळेला हॅण्डल करण्याची तुमची क्षमता बडी, प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देऊन त्यांचे  शंकासमाधान करण्याचं तुमचं कौशल्य बडे.
अडीचशे-अडीचशे जणांचे ग्रूप सांभाळण्याचं तुमचं कौशल्य,आणि तुमचा संयम खूपच बडा.
तुमचं अध्यापन कौशल्य अफलातुन,
बडे सर तुमचा स्टॅमिना बडा, तुमचा वक्तशीरपणा बडा.
तुमची धडपड बडी, तुमचे प्रयत्न बडे.
आणि सर्वात महत्त्वाचे या सगळ्यांसाठी जे आवश्यक आहे ते  प्लॅनिंग जबरदस्त बडे.
जे काही स्वतःजवळ आहे,ते सगळं काही मनापासून देण्याची तुमची भावना बडी
काहीही हातचं राखून न ठेवता  संपूर्ण ज्ञान आपल्या समोरच्या प्रत्येक  वयोगटाच्या विद्यार्थ्यांला मनापासून देण्याचं  काम करणारा तुमच्यातला शिक्षक खूप खूप बडा आहे.
 काय बोलू आणखी तुमच्यासाठी सर, तोंडातून येतो एकच उद्गार, शाबास गुरुजी.
खरोखरच आपण सर्वार्थाने, सर्व बाजूंनी नावाप्रमाणेच बडे आहात सर,  तुमच्यातल्या या शिक्षकाला मनापासून सलाम. लाख मोलाचं ज्ञान देणा-या तुम्हाला,  तुमच्या या ज्ञानार्जन कार्यास, माझ्या लाख लाख शुभेच्छा. खूप खूप खूप धन्यवाद सर.
🙏🙏 *विद्वान सर्वत्र पूज्यंते हेच खरे 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐  
               
   ✒️ लेखन ✒️    
 ✍️ प्रशिक्षणार्थी सौ.अर्चना पाटील✍

🔶 प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया 🔶

श्री. पांडुरंग बुट्टे पाटील सर

Drive embed video Code

मुख्याध्यापक, श्री. एस. पी. वाघामोडे 

Drive embed video Code

श्री. अतुल दौंडकर सर

Drive embed video Code

मुख्याध्यापक, श्री. कैलास काकडे सर

Drive embed video Code

श्री. सुभाष शिंदे सर 

Drive embed video Code

श्रीमती अश्विनी मोहिते मॅडम 

Drive embed video Code

श्रीमती रेशमा हळदे मॅडम 

Drive embed video Code
Drive embed video Code

Subscribe News Letter

नमस्कार🙏
डिजिटल तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराने आपली दैनंदिन अवघड व वेळखाऊ कामे सोपी व जलद गतीने करता येतात. पण डिजिटल टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने बदलते हा तिचा नैसर्गिक स्वभाव आहे. आपल्याला नविन टेक्नॉलॉजीची लवकर माहिती मिळावी या उद्देशाने *Technology News Letter* हा उपक्रम *शाबास गुरुजी* संस्थेने

Teachers, Trainers, Coaches, Counsultants, Counsellors and all service providers यांच्यासाठी सुरु केला आहे…

News Letters हे वैयक्तिक What’s App वर पाठवले जातील यासाठी कोणताही गृप नसेल…

पहिल्या ५००० हजार मेंबरला हि सुविधा मोफत आहे…
त्यानंतर वार्षिक फिस भरुन जॉईन होता येईल…

तुम्हाला हि संधी सद्या उपलब्ध आहे. लगेच जॉइन व्हा!

Start chatting
1
Chat
Hello..!
I'm ready To Help You...
About Us पेजवर तुमचे स्वागत आहे...
तुमच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी
Start Chatting वर क्लिक करुन Hi Shabas Guruji मॅसेज send करा..