New RG App Launched!

{MM,DD YYYY}

पहिला मराठी ब्रॅंड
Google & Meta Blue Tick Verified

GoogleMetaVerifiedBrand_ixmzm_2000

AI Powered Platform

No.1 Learning Platform for
Teachers, Trainers, Coaches, Counselors & Consultant

Learn About Professional Video Editing, Video Course Creation, Learning Management System, Landing Pages, What's app Automation, Lead Generation and Conversion System, Video Marketing Funnel system, Sales funnel, Coaching Business Automation Techniques with AI technology

LearnOnline_u2nte_600
SGLogo_cxnti_980

हि संस्था Schools/Colleges, Coaching Institutes व Service Business ला Digitalize करुन Automation System शिकविण्याच्या उद्देशाने सुरू आहे. या संस्थेमध्ये उद्योगांना डिजिटलाईज करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते आणि जे आधीच डिजिटल आहेत त्यांना ऑटोमेशन शिकवले जाते. तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मिती कौशल्य विकास प्रशिक्षण लवकरच सुरू होत आहे.

SubhashBade_kwnzm_720

श्री. सुभाष बडे

यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले. तसेच शासकीय राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत 270 तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विजेते घडविले आहेत. सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....

  • राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार
    (काव्यमित्र संस्था पुणे)
  • राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार
    (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन)
  • वीरचक्र पुरस्कार
    (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)
  • Certified WhatsApp Automation Expert
    (Meta, India & Aisensy India)
  • Certified Neurolinguistics Programming Practitioner
    (ANLP, India)
_k1mtu_826

शासकीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती राज्यस्तरीय पुरस्कार विजेते

VijayWanveSir_e2ntg_1075

श्री. विजय वणवे सर 
राज्यस्तरीय प्रथम

विषय : परिसर अभ्यास 

DuryodhanjatharSir_g4nzg_469

श्री. दुर्योधन जठार सर 
राज्यस्तरीय द्वितीय

विषय : परिसर अभ्यास 

ShushmaMajarekar_k1otg_720

श्री. सुषमा मांजरेकर मॅडम
राज्यस्तरीय तृतीय

विषय : भाषा 

GauriGaywan_iwnjm_345

सौ. गौरी गायवन  मॅडम
राज्यस्तरीय तृतीय

विषय : गणित 

PrakashSurveSir_y5oty_1195

श्री. प्रकाश सुर्वे सर
राज्यस्तरीय तृतीय

विषय : विज्ञान, सामाजिक शास्र  

VivekanandDhakne_q1nzm_714

श्री. विवेकानंद ढाकणे सर 
राज्यस्तरीय तृतीय

विषय : विज्ञान

प्रशिक्षणार्थींनी लिहिलेल्या कविता

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक

मी आहे तंत्र अडाणी
बडे सरांचा मंत्रकानी,
करील मजला तंत्रज्ञानी
गाऊ त्यांची गोड गाणी,
बडे सरांची अमृतवाणी
तंत्रज्ञानाचा खजिना भारी,
आम्हाला मोबाईलने जोडी
तोंडावर बोट हाताची घडी,
बडे सरांची जादूगिरी
मोबाईलशी लावली जोडी,
अँपची आहे मजाच न्यारी
तंत्रज्ञानाचा जुगाड भारी,
बडे सरांची वाणीच न्यारी..
आदरणीय बडे सर...!

तुमचा  
प्रशिक्षणार्थीश्री. राजेश तेलगोटे सर

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक

बडे सर तुम्ही खंरच कमाल केली
अवघड काम सोपं करूनी धमाल उडवून दिली.

Advance डिजिटल तंत्रज्ञानातले तुम्ही मुरब्बी
प्रत्येक सेशन्स सुरेख पटवून केली आमची प्रगती.

बोलण्याची अदा निराळी इतरांना खिळवून ठेवण्याची कला
बडे सर तुमचे डिजिटल ज्ञान पाहूनी अभिमान वाटतो आम्हाला.

सगळेच सेशन्स तुम्ही उत्तमपणे आम्हास शिकवले.
सहजपणे तञज्ञानाची दालनेउघडून आम्हास डिजिटल करून टाकले.

या गृप मध्ये येऊन एक मनाला समाधान वाटलेबडे सरासारखे अनुभवी मार्गदर्शक यामध्ये भेटले.

तुमचा उत्साह पाहूनी आम्हाला उत्तेजन मिळाले
डिजिटल तंत्रज्ञान किती  महत्वाचे  हे तुमच्या मुळे कळाले.

आयुष्यात प्रगतीच्या शिखरावरबडे सरासारखा अढळ ध्रुव तारा
जर कोणाला आढळला तरसमजून घ्या नक्कीच त्या व्यक्तीचा भाग्योदय झाला.

तुमची  प्रशिक्षणार्थी
सौ. ऊलका शिरीष कुलकर्णी

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक

बडे सरांचे ज्ञानस्नेही आहोत आपण
आता तंत्र नवे शिकूया...
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या...

नाही अवघड काही येथे, फारच आहे easy
बडे सरांसोबत रोज आपण होऊ जरा Busy...

सरांच्या meeting मध्ये जॉईन होऊन
आपण दृष्टिकोन zoom करूया
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या....

Chatbox मध्ये मत मांडून होईल शंकासमाधान...
युट्युब वर जाऊन करू ज्ञानाची देवाणघेवाण ...
Login करू ezee app अन विश्वास मनात जागवू या...
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या...

शिकवतो आपण नेहमी त्याला देऊ थोडे टेक्निक...
शाबास गुरुजीच्या वेबसाईटवर सारेच करू या क्लिक...

व्हिडिओ पाहून share, like अन download करु याटे
क्नॉलॉजीच्या सोबत सारेच तंत्रस्नेही होऊ या ...

तुमची प्रशिक्षणार्थी
-करुणा

चला शाबास गुरूजींच्या शाळा
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।


OTG कनेक्शन, माऊस पाँईंटर,
Keep नोटसचा केला वापर,
गुगल ड्राइव्हचा दैवी अवतार
15GB चा फुकटचा वापर,
वेळ कोर्सची व्यवस्थित पाळा ||1||
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।

बँकग्राऊंड Eraser पाहिला
फोटो पाहिजे तसा बनविला,
पिक्सल लॅबवर प्रोजेक्ट केला
RAR वर मराठी फॉन्ट घेतला,
फोटो एडीटरचे नियम पाळा ।।2।।
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।|

KineMaster चा भावच न्यारा
आँडीओ व्हीडीओ चा येथे तोरा
अँनिमेशन टाईम करा अँडजस्ट
नाही तर वाजल तुमचा बोरा,
मिळेल ग्रिनस्क्रिनचा फळा ||3||
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।

Xodo वर पाठ घेऊन
फेसबुक पेज दाखवा,
फार्मस अँपवर सर्वेहर्ट
माहिती पटापट मिळवा,
गुगल फॉर्म परीक्षेचा ताळा।।4।।
जमला तंत्रस्नेहींचा मेळा।

तुमचा
प्रशिक्षणार्थी श्री. शहाजी अनंत कुंभार

⭕ सरस्वतीपूत्र सुभाष बडे सर ⭕

ज्यांची भाषा सुस्पष्ट, साधी, सरळ, सोपी
असे  सुभाषिक सुभाष सर.
नावाला साजेल असेच सुभाषिक आहात तुम्ही.
काय बोलावं सर तुमच्याबद्दल.....

मूर्ती लहान पण ज्ञान मात्र बडे, असे आमचे,
आम्हाला आमच्या भाग्याने लाभलेले
सरस्वतीपुत्र बडे सर.

सर, तुमचा अभ्यास बडा,
तुमचं ज्ञान अफाट (बडे)
ते समजावून सांगण्याची कला बडी,
ट्रेनिंग मधील वीस पंचवीस वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एका वेळेला हॅण्डल करण्याची तुमची क्षमता बडी,

प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देऊन
त्यांचे शंकासमाधान करण्याचं तुमचं कौशल्य बडे.
एकाच वेळी पाचशे ते हजार प्रशिक्षणार्थी सांभाळण्याचं
तुमचं कौशल्य आणि तुमचा संयम खूपच बडा.
तुमचं अध्यापन कौशल्य अफलातुन,
बडे सर तुमचा स्टॅमिना बडा. 

तुमचा वक्तशीरपणा बडा.
तुमची धडपड बडी,
तुमचे प्रयत्न बडे.
आणि सर्वात महत्त्वाचे या सगळ्यांसाठी जे आवश्यक आहे ते प्लॅनिंग जबरदस्त बडे.

जे काही स्वतःजवळ आहे,
ते सगळं काही मनापासून
देण्याची तुमची भावना बडी

काहीही हातचं राखून न ठेवता  
संपूर्ण ज्ञान आपल्या समोरच्या प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यांला मनापासून देण्याचं काम करणारा तुमच्यातला शिक्षक खूप खूप बडा आहे.

काय बोलू आणखी तुमच्यासाठी सर,
तोंडातून येतो एकच उद्गार, शाबास गुरुजी.
खरोखरच आपण सर्वार्थाने,
सर्व बाजूंनी नावा प्रमाणेच बडे आहात सर,  
तुमच्यातल्या या शिक्षकाला मनापासून सलाम.

लाख मोलाचं ज्ञान देणा-या तुम्हाला,  
तुमच्या या ज्ञानार्जन कार्यास,
माझ्या लाख लाख शुभेच्छा.
खूप खूप खूप धन्यवाद सर.🙏
विद्वान सर्वत्र पूज्यंते हेच खरे 🙏
💐💐💐💐💐💐💐💐

✒️ लेखन ✒️
✍️ प्रशिक्षणार्थी सौ.अर्चना पाटील✍

शाब्बास गुरुजी

शाब्बास गुरुजींची टीम
आहे लईच ओ भारी!
बडे सर आणि टीमचे
राहु सदैव आम्ही आभारी!!

मनमिळावू स्वभाव
सेवाभावी वृत्ती जपली!
शाब्बास गुरुजींच्या
टीमने अध्यापनाची वाट दावली!!

सखोल आणि खोलवर
दिले तंत्रज्ञानाचे ओ धडे!
हसतमुख आणि दिलदार
आहेत सर आमचे ओ बडे!!

मोबाईल पडत होता भारी
त्याची कमी केली दादागिरी!
बनवून त्याला आमचा पीए,
दिली आम्हाला ओ उभारी!!

कोरोनाच्या या संकटात
अवघड झाले अध्यापन!
कानमंत्र देऊन बडे सरांनी
वाढवली जगात आमची शान!!
आम्ही अडाणी गुरुजी अडकून पडलो घरात!
ऑनलाईन अध्यापनाची करावी लागे कसरत!!

शाब्बास गुरुजींची
टीम आली बघा ती धाऊन!
हसत खेळत तंत्रज्ञानाचे दिले
आम्हा अनमोल ज्ञान!!

आता नाही मागे हटणार,
शाब्बास गुरुजी होणार!
शाब्बास गुरुजी टीमचे
विश्वात नाव मी करणार!!

झालोय अॅडव्हांस आम्ही
आता नाही कशातच मागे राहणार!
घेऊन शाब्बास गुरुजींचे नाव
बिनधास्त उडी ओ मारणार!!

सोबत राहो अशीच आपली
मैत्रिच्या या कट्ट्यावर!
फडकत रहावा झेंडा आपला
तंत्रज्ञानाच्या या युगावर!!

तुमचा प्रशिक्षणार्थी कवी:-
भा. रा. कडू संगमनेर जिल्हा अहमदनगर

Support 


आमची टीम तुम्हाला सेवा द्यायला सदैव तत्पर आहे.

Live Chat Time
10:00 am To 09:00 pm
24 X 7 Chatbot Support

2,00,000 हून अधिक शिक्षकांनी अनुभवलेली विश्वसनीय सेवा 

चिंचवड, पुणे - 411033

Subscribe News Letter

नमस्कार🙏
डिजिटल तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराने आपली दैनंदिन अवघड व वेळखाऊ कामे सोपी व जलद गतीने करता येतात. पण डिजिटल टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने बदलते हा तिचा नैसर्गिक स्वभाव आहे. आपल्याला नविन टेक्नॉलॉजीची लवकर माहिती मिळावी या उद्देशाने Technology News Letter हा उपक्रम शाबास गुरुजी संस्थेने Technology प्रेमी Teachers, Trainers यांच्यासाठी सुरु केला आहे...

News Letters हे वैयक्तिक What's App वर पाठवले जातील यासाठी कोणताही गृप नसेल...

पहिल्या ५००० हजार मेंबरला हि सुविधा मोफत आहे...
त्यानंतर वार्षिक फिस भरुन जॉईन होता येईल...

तुम्हाला हि संधी सद्या उपलब्ध आहे. लगेच जॉइन व्हा!

Whatsappiconsvg_e4odk_128

Privacy Policy |Terms & Condition | Refund Policy | Designed by Shabas Guruji |Copyrights @ 2024

WAIT!

Live Training
लवकरच उपलब्ध होईल... 
2/3 दिवसांनी पुन्हा तपासून पहावे 

SGLogo_cxnti_980

माहिती शासकीय योजनांची

माहिती शालेय शासकीय योजनांची...
या अभियानांतर्गत,

योजना नं. 1 :
मराठी / इंग्रजी / सेमी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 वी सीबीएसई (CBSE) पॅटर्नचे व उच्च गुणवत्तेचे शिक्षण मोफत मिळवण्याची संधी

योजना नं. 2 :
6 वी पासून दरवर्षी 5000 किंवा 7500 रुपये शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य मिळवण्याची संधी

वरील योजनेचे लाभ मिळणारे बहुतांश विद्यार्थी भविष्यात क्लास १ अधिकारी पदावर काम करतात...

अनेक शासकीय योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली नसते. कधीकधी अपूर्ण माहिती पोहोचलेली असते. त्यामुळे अनेक योजनांपासून आपण वंचित राहत असतो. या वेबिनार मध्ये तुम्हाला संपूर्ण व सविस्तर माहिती 6 वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या तज्ञांकडून देण्यात येणार आहे.

जून 2024 पासून 3री, 4थी, 5वी मध्ये मराठी / इंग्रजी / सेमी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या व मुलांना क्लास १ अधिकारी बनविण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या मुलांच्या पालकांनीच हा वेबीनार अटेंड करावा.

शनिवार, दिनांक: 18/05/2024
वेळ रात्री 7:00 - 09:00 वा
ठिकाण : Zoom App वर 

वेबीनार जॉईन लिंक खालील ग्रुप मध्ये मिळेल👇